NGN News
Latest Marathi News

चांदवडला महिला मंडळ अधिकारी जेरबंद; ५० हजाराची स्वीकारली लाच

  • योगिता भोये यांच्यावरील ‘एसीबी’च्या कारवाईने जिल्हाभर खळबळ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : चांदवड तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला ५० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. योगिता आनंद भोये असे या अधिकाऱ्याचे नाव असून ‘एसीबी’च्या कारवाईने जिल्हाभर खळबळ माजली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वडिलोपार्जित शेतजमीन असलेल्या तक्रारदाराचा काही व्यक्तींशी वाद झाल्याने त्याने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणी दरम्यान तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देत महसूल विभागाला संबंधित जमिनीचा ताबा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चांदवड तहसीलदारांनी संबंधित जमिनीचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी मंडळ अधिकारी या नात्याने भोये यांच्याकडे दिली. तथापि, या प्रक्रियेसाठी भोये यांनी ६० हजार रकमेची लाच मागितल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. तडजोडीत ही रक्कम ५० हजारावर निश्चित करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला त्याबाबत माहिती देण्यात आली. पडताळणी नंतर एसीबी पथकाने सप्ला रचून भोये यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.