
- धर्मांतर आणि फसवणुकीचे थेट पुरावे; चौघे संशयित केन्द्रस्थानी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीत कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या खळबळजनक प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य गुन्हा असलेल्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ‘विशेष तपास पथका’ने तब्बल १५०० पानांचे टाकणारे मूळ दोषारोपपत्र नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र व विशेष न्यायालयात दाखल केले आहे. आरोपींनी अत्यंत पद्धतशीरपणे, फौजदारी पात्र कट रचून हा गुन्हा केल्याचे ‘एसआयटी’च्या तपासात निष्पन्न झाले आहे.
चार मुख्य संशयितांविरोधात दोषारोपपत्र
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि. नं. १५६/२६ अन्वये पोलिसांनी खालील मुख्य संशयित दानिश इजाज शेख, तौसिफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान, मतेन माजीद पटेल यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या एसआइटी ने या गुन्ह्याचा तांत्रिक आणि वैज्ञानिक दृष्टीने तपास करून भक्कम पुरावे गोळा केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १८३ अन्वये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेसह १७ महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
धर्मांतर आणि फसवणुकीचे थेट पुरावे
पीडितेचे बळजबरीने धर्मांतर केल्याचे व धार्मिक भावना दुखावल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींनी पीडितेचे नाव बदलण्याच्या उद्देशाने तिची मूळ कागदपत्रे स्वतःच्या ताब्यात घेतली होती, ती पोलिसांनी जप्त केली आहेत. तसेच पीडिता आणि आरोपींचे मोबाईल, व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट्स आणि ईमेल ट्रेल्स जप्त करण्यात आले असून, यातून आरोपींचा कट उघड झाला आहे. पीडिता व आरोपींचे वैद्यकीय तपासणी अहवाल, आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि आर्थिक फसवणुकीचे दस्तऐवज न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरलेले वाहन, घटनास्थळाचा पंचनामा, जातीचे दाखले आणि जप्त मुद्देमालाची ओळख परेड यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.
Comments are closed.