
- महिलांना धमकवल्याची, शोषण केल्याची ‘एसआयटी’ कडे कबुली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच त्यांचे शोषण केल्याची कबुली अशोक खरातने ‘एसआयटी’ कडे दिल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानाचे नाव दिल्याचे सांगताना ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’.. अशी मुक्ताफळे त्याने ओढल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
भोंदूबाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. महिलांचे लैंगिक शोषण, मनी लौन्द्रिंग, बेनामी मालमत्ता, राजकीय व्यक्तींसोबत संबंध अशा अनेक आरोपांखाली अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरु आहे. ज्या गोष्टींना लोक चमत्कार आणि वशीकरण समजतात, ती हातचलाखी असल्याचं अशोक खरातने मान्य केल्याचेही सांगण्यात येत आहे.
दोन्ही मुलीही चौकशीच्या फेऱ्यात ?
दरम्यान, खरातने आपल्या दोन्ही मुलींच्या नावावर कोट्यवधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर साक्षी आणि तृप्तबाला या खरात कन्या एसआयटी चौकशीच्या फेऱ्यात येणार आहेत. दुसरीकडे खाराटची पत्नी कल्पना आणि मुलगा हर्षवर्धन हे दोघेही अजून फरार असून त्यांच्या मागावर पोलीस असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
Comments are closed.