
- समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी ‘हजेरी’ होणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चौकशी परिघात अखेर चाकणकर भगिनींची एन्ट्री झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी अधिकृत नोटीस बजावली आहे. कोपरगाव येथील समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली असून तीन्वये त्यांना चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे
प्राप्त माहितीनुसार, खरात याच्या विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासादरम्यान पोलिसांना ‘समता पतसंस्थेत’ खरातशी संबंधित अनेक संशयास्पद खाती आढळली आहेत. प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे या पतसंस्थेत एकूण चार खाती आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खात्यांवरून तब्बल २.४० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या आर्थिक व्यवहारांचा खरातच्या सावकारी व्यवसायाशी काय संबंध आहे, हे पैसे नेमके कोणाचे आहेत, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ५ दिवसांच्या आत त्यांना चौकशीसाठी आणि जबाब नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.
Comments are closed.