
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा खळबळजनक प्रकार सार्वत्रिक चर्चेचा विषय बनला असताना त्यामागे दहशतवादी कनेक्शन असल्याची शक्यता गडद झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणात आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) एन्ट्री करून चौकशी करणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहशतवादी कनेक्शन असल्याची शक्यता घेवून नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्रे आता NIA कडे सुपूर्द केली आहेत. NIA विविध अंगांनी तपास करण्याची शक्यता असून त्यामध्ये या प्रकरणात देशविघातक शक्तींचा हात आहे का, आरोपींना हे सर्व करण्यासाठी लागणारी धनशक्तीचा नेमका स्त्रोत काय, या प्रकरणाची सूत्रे एखाद्या विदेशी व्यवस्थेच्या हाती तर नाहीत, नाशिकमधील संशयितांचे नेमके कोणाशी संवाद घडून आलेत आदींचा त्यामध्ये समावेश आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे धागेदोरे जुळतात का, याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महिला आयोग पिडीतांशी संवाद साधणार
या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) उच्चस्तरीय पथक नाशिकमध्ये दाखल होत आहे. हे पथक थेट कंपनी आवारात जाणून पाहणी करणार आहेत. या पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बी. के. सिन्हा, सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. हे पथक केवळ पाहणीच करणार नाही, तर पीडित महिलांशी सविस्तर चर्चा करून आपला गोपनीय अहवाल आयोगाला सादर करणार आहे.
Comments are closed.