NGN News
Latest Marathi News

नासिक जिमखाना अध्यक्षपदी नरेंद्र छाजेड; सरचिटणीसपदी राधेशाम मुंदडा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नासिक जिमखाना या क्रीडा संस्थेच्या अध्यक्षपदी नरेंद्र छाजेड यांची पुढील चार वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्षपदी नितीन मोडक व राजेश भरवीरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या ४५ वर्षापासून नरेंद्र छाजेड हे नाशिक जिमखाना या संस्थेशी सलग्न असून यांनी या काळात टेबल टेनिस सेक्रेटरी, चिटणीस, चेअरमन आणि अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली आहेत. अध्यक्ष या नात्याने ते २५ वर्षापासून संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळत आहे.

कार्यकारिणी सदस्य म्हणून राधेशाम मुंदडा, शेखर भंडारी, मिलिंद जोशी, झुलकरनैन जागीरदार, अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड, वैभव जोशी, ऋषिकेश पालवे व मोहन सदावर्ते हे बिनविरोध निवडून आले. संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी बोलावलेल्या पहिल्या बैठकीत खालील पदाधिकारी व विविध खेळांचे गेम सेक्रेटरी निवडण्यात आले.

संस्थेच्या सरचिटणीसपदी राधेशाम मुंदडा यांचीही बिनविरोध फेर निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून मिलिंद जोशी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कोषाध्यक्ष पदी नितीन चौधरी यांची तर सहचिटणीस पदी शेखर भंडारी यांची निवड झाली.

विविध खेळाच्या सेक्रेटरी पदी खालील प्रमाणे निवड करण्यात आली.
टेनिस सेक्रेटरी– नितीन मोडक
बॅडमिंटन सेक्रेटरी – मिलिंद जोशी
टेबल टेनिस सेक्रेटरी – वैभव जोशी
शूटिंग सेक्रेटरी – झुलकरनैन जागीरदार
बास्केटबॉल  सेक्रेटरी – अलिअसगर आदमजी

बुद्धिबळ   सेक्रेटरी – शेखर भंडारी 
क्रिकेट सेक्रेटरी – अभिषेक छाजेड
कार्यालयीन व्यवस्थापन– ऋषिकेश पालवे
शॉपिंग सेक्रेटरी– मोहन सदावर्ते

प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून अँड प्रशांत जोशी यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अँड प्रसाद नागरे व अँड. मतिनउद्दीन काझी यांनी पाहिले. याकामी संस्थेचे व्यवस्थापक संजय मराठे व लिपिक योगेश सांगळे यांनी सहकार्य केले.
यांच्या निवडीबद्दल डॉ. जितेंद्र भालेराव, रामेश्वर कलंत्री, समीर रकटे, 

अँड.ओमप्रकाश लोया, प्रमोद पुराणिक अँड. नंदकिशोर लाहोटी, डॉ. महेश मालू, प्रीतीश छाजेड, यतिन शहा, नितीन कोचर, महेश कित्तूर, समीर मांजरेकर, माणिक सोनवणे आदी मान्यवरांनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.