
- ‘टीसीएस’ प्रकरणी एसआयटीच्या हाती महत्वाची माहिती
- त्र्यंबकेश्वर रोडवरील ‘हॉटेल आनंद रिसॉर्ट’ वर धडक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘टीसीएस’ कंपनीतील कारनाम्यांचा छडा लावताना एसआयटीच्या हाती महत्वाची माहिती उपलब्ध झाली आहे. संशयित आरोपी एका विशिष्ट रिसॉर्टवरील पार्ट्यांमध्ये मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवत आणि फूस लावत असत. त्र्यंबकेश्वर रोडवरील या रिसॉर्टवर धडक देत एसआयटी पथकाने कारवाईची बडगा उगारला आहे. याच ठिकाणाहून धर्मांतर आणि लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे षडयंत्र रचले गेल्याचा संशयही यानिमित्त बळावला आहे.
त्र्यंबकेश्वर रोडवरील ‘हॉटेल आनंद रिसॉर्ट’ येथे या प्रकरणातील संशयित आरोपी २०२२-२३ दरम्यान रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी पथकाने येथे छापा महत्त्वाची कागदपत्रे आणि गेस्ट रजिस्टर आपल्या ताब्यात घेतले आहेत. या रिसॉर्ट’वर सातत्याने पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याचे त्यावरून सिध्द झाले आहे . केवळ पार्टी हॉलच नव्हे, तर हॉटेलमधील रूम्सदेखील मोठ्या प्रमाणावर बुक केल्या जात असल्याचा पथकाला संशय आहे. पार्ट्यांमध्ये कंपनीतील हिंदू मुलींना बोलावले जात असे. संशयित आरोपी या पार्ट्यांमध्ये मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखवून फूस लावत, अशी धक्कादायक माहितीही यानिमित्त पुढे आली आहे.
व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांची कसून चौकशी
एसआयटी पथकाने हॉटेल व्यवस्थापक आणि तेथील कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली आहे. या पार्ट्यांसाठी कोणाच्या नावाने बुकिंग व्हायचे, पार्ट्यांचे स्वरूप काय असायचे आणि तिथे नेमके कोण-कोण उपस्थित असायचे, याची माहिती कर्मचारी आणि रजिस्टरमधून गोळा करण्यात आली आहे. येथील पार्ट्यांच्या माध्यमातून आणखी किती मुलींचे शोषण झाले, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.