
- 1.7 मेगावॅट प्रकल्पामुळे ऊर्जा खर्चात बचत होणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), ही फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीतील कंपनी आणि महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, आपल्या सीएसआर विभाग बीपीसीएल फाउंडेशनच्या माध्यमातून, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (एसएसएसटी), शिर्डी यांच्यासोबत भागीदारी करून, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट च्या इमारतींवर 1.7 मेगावॅट क्षमतेची ग्रिड-जोडलेली रूफटॉप सौर पीव्ही वीज निर्मिती प्रणाली उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे शाश्वत ऊर्जा आणि समुदाय विकासाबाबतची त्यांची बांधिलकी अधिक दृढ झाली आहे.या उपक्रमांतर्गत, बीपीसीएल फाउंडेशन ही अंमलबजावणी संस्था ) म्हणून कार्य करेल, तर एसएसएसटी, शिर्डी ही कार्यान्वयन संस्था म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 4,45,25,751 रुपये (जीएसटीसह) इतकी आर्थिक मदत देण्यात येणार असून, हा प्रकल्प १५ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पातून स्व-उपभोग आणि नेट मीटरिंगद्वारे दरवर्षी सुमारे 26.9 लाख युनिट्स वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे. यामुळे दरवर्षी सुमारे रुपये2.56 कोटींची लक्षणीय बचत होईल, तसेच कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासही मदत होईल. या उपक्रमाचा लाभ शिर्डी येथील एसएसएसटीमध्ये अनुदानित निवास सुविधांचा लाभ घेणाऱ्या 10 लाखांहून अधिक भक्तांना होणार आहे.
बीपीसीएल फाउंडेशन आणि एसएसएसटी, शिर्डी यांच्यात औपचारिक सामंजस्य करार मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्ये मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच एसएसएसटीचे वरिष्ठ अधिकारी सीईओ गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराव दराडे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले आणि उपकार्यकारी अभियंता (विद्युत) किशोर गवळीयांचा समावेश होता.
सामंजस्य करारावर सुश्री बीना मानसुख, महाव्यवस्थापक (प्रशासन सेवा, सुविधा व सीएसआर ), कॉर्पोरेट कार्यालय तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, बीपीसीएल फाउंडेशन, आणि श्री गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या प्रसंगी बीपीसीएल आणि बीपीसीएल फाउंडेशनचे सिनियर ऑफिसियल्स देखील उपस्थित होते. यामध्ये श्री देवेंद्र जोशी, जीएम (अॅडमिन सर्व्हिसेस) तसेच सीएसआरची अॅडिशनल चार्ज; श्री राजेश टिके, डीजीएम फायनान्स (सीएसआर); श्री संजय यादव, डीजीएम (सीएसआर); श्री मुकेश मुनेश्वर, असिस्टंट एक्झिक्युटिव (सीएसआर) व सेक्रेटरी, बीपीसीएल फाउंडेशन; श्री एन. मेघनाथन, डिप्टी जनरल मॅनेजर (एचआरएस); श्री अभिजीत चव्हाण, स्टेट हेड (रिटेल), महाराष्ट्र; श्री महेश एम, टेरीटरी मॅनेजर (एलपीजी), नाशिक; श्री राजकुमार मिश्रा, मॅनेजर सेल्स (एलपीजी), अहमदनगर; श्री मनोज जाधव, टेरीटरी मॅनेजर, अहमदनगर; तसेच श्रीमती हर्षा बिदावटका, सेल्स ऑफिसर, शिर्डी यांचा समावेश होता.ही इनिशिएटिव्ह बीपीसीएलच्या क्लीन एनर्जी अडॉप्शनला प्रोत्साहन देण्याच्या आणि मीनिंगफुल पार्टनरशिप्सच्या माध्यमातून सस्टेनेबल इम्पॅक्ट निर्माण करण्याच्या सातत्यपूर्ण फोकसला अधोरेखित करते, तसेच भारताच्या रिन्यूएबल एनर्जी गोल्समध्ये योगदान देते.
Comments are closed.