
- दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक: नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात बदली करण्यात आली आहे. कराळे यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कराळे हे याआधी विशेष पोलीस महानिरीक्षक ( प्रशिक्षण ) या पदावर कार्यरत होते.
राज्यातील पोलीस दलातील २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आली आहे. यामध्ये नाशिकचे पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांचाही समावेश आहे.
खरात प्रकरण भोवले ?
दरम्यान, आयजी पदावर असताना दत्ता कराळे यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि दत्ता कराळे यांचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला होता. भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमात दत्ता कराळे का गेले, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. दत्ता कराळे यांनी या कार्यक्रमात भाषणही केले होते. दत्ता कराळे आणि अशोक खरात यांच्यात १८ वेळा फोनवरुन बोलणे झाल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला होता. कराळे यांची अशोक खरात प्रकरणी चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली होती. पोलीस महासंचालक सदानंद दातेंना याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले होते. एकूणच कराळे यांना खरात प्रकरण भोवल्याची चर्चा आहे.
Comments are closed.