NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या आर्या बोरसेला सुवर्ण व कांस्य पदक

  • २४ व्या कुमार सुरेंद्रसिंग शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कामगिरी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोपाळ येथे सुरू असलेल्या २४ व्या कुमार सुरेंद्रसिंग शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये नाशिकच्या आर्या बोरसे हिने उल्लेखनीय कामगिरी करत सांघिक सुवर्णपदक आणि वैयक्तिक कांस्यपदक पटकावले आहे.

आर्याने सिनिअर महिला 10 मीटर पीप साईट एअर रायफल प्रकारात ही दोन्ही पदके मिळवली. पात्रता फेरीत तिने 631.4 गुणांची कमाई करत तिसरे स्थान मिळवले होते. अंतिम फेरीतही उत्कृष्ट प्रदर्शन कायम राखत तिने वैयक्तिक कांस्यपदकावर नाव कोरले. यासोबतच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आर्याने संघाला सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यातही मोलाची भूमिका बजावली.

आर्याच्या या यशाबद्दल जिल्हा क्रीडा संघटना, नाशिक यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले असून, विविध स्तरांतून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.