NGN News
Latest Marathi News

साक्री उपनगराध्यक्षपद; राजकीय नाट्याला भाजपचे प्रतिउत्तर

  • उपनगराध्यक्षपदी गजेंद्र भोसले; सर्वांगीण विकासाचा नवा रोडमॅप सादर

** अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून साक्री नगरपंचायतीच्या राजकारणात आणि विकासकामांबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे सडेतोड उत्तर दिले. त्यांनी अफवांचे खंडन करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा नवा रोडमॅप यावेळी सादर केला.

यावेळी नगराध्यक्ष उषा पवार,गटनेते बा पूसाहेब गीते, उपनगराध्यक्ष अॅड. गजेंद्र भोसले, नगरसेवक प्रविण निकुंभ,आबा सोनवणे,स्वप्निल भावसार उपस्थित होते.चंद्रजीत पाटील यांनी सांगितले की, नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांच्या बनावट राजीनाम्याबाबतच्या बातम्या कशा खोट्या होत्या,ही बाजु मांडण्यासाठी आपण ही पत्रपरिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.उज्वला भोसले यांचा ठरल्याप्रमाणेच राजीनामा झाला. त्यानंतरच उपनगराध्यक्षांची निवड ही सर्व प्रक्रिया कायदेशीर आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडली.या प्रक्रियेनंतर गजेंद्र भोसले यांची पुन्हा एकदा उपनगराध्यक्षपदी निवड झाली.चंद्रजीत पाटील व बापुसाहेब गिते यांनी विरोधकांचे सर्व दावे पुराव्यांसह खोडून काढले.साक्री शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर केला जात आहे.

शहरातील सर्व वसाहतींमध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत.बंद असलेल्या दिव्यांबाबत कंत्राटदाराला ताकीद देण्यात आली असून, काम वेळेत न झाल्यास कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचा इशारा देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता योग्य जागेचा शोध सुरू असून लवकरच तो प्रश्न मार्गी लागेल. शहरात कोट्यावधींची विकासकामे झाली आहेत.पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव देखील मंत्रालयात असून प्रगतीपथावर आहे. कामे होत आहेत.शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल,असेही यावेळी सांगण्यात आले.वार्ड क्र.३ व ४ मध्ये मोठी जागा असून त्याठिकाणी एक कोटीतून नमो उद्योन साकारण्यात येणार आहे.निविदा टाकली असून योग्य ठेकेदार मिळाल्यानंतर लवकरच काम सुरू केले जाईल,असे यावेळी गटनेते बापुसाहेब गिते यांनी सांगितले.

Comments are closed.