
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. सर्वाधिक उत्कंठा लागून राहिलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा गड उद्वस्त करून भाजपने प्रथमच या राज्यात झेंडा रोवला. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. केरळमध्ये डाव्यांची सद्दी संपवत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली. तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले.
या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. देशात प्रथमच डाव्यांची सद्दी संपली तर बंगालमध्ये ममतांना जनतेने सत्ताच्युत केले. केरळ राखण्यात यश मिळाल्याने कॉंग्रेसला एका अर्थाने संजीवनी मिळाली. पाच राज्यांतील निकाल असे :
- पश्चिम बंगाल
एकूण जागा-293 : भाजप- 195 तृणमूल काँग्रेस- 92 काँग्रेस -0 डावे पक्ष- 02 इतर-2
- तामिळनाडू
एकूण जागा-234 : द्रमुक- 68 अण्णाद्रमुक-58 टीव्हीके-106 इतर-00
- केरळ
एकूण जागा-140 : काँग्रेस-104 डावी आघाडी -34 इतर-2
- आसाम
एकूण जागा-126 : भाजप-100 काँग्रेस- 20 इतर-6
- पुद्दुचेरी
एकूण जागा – 30 : भाजप- 22 काँग्रेस-6 इतर-2
Comments are closed.