NGN News
Latest Marathi News

सुनेत्रा वहिनींचा राष्ट्रीय विक्रम; करूणा मुंडे, बिचुकलेना किती मते ?

** एनजीएन न्यूज नेटवर्क

पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल २४ च्या फेरीअखेर जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० इतक्या विक्रमी मताधिक्याने विजय प्राप्त केला. अपक्ष करूणा मुंडे यांना १२५ मते, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाली. 

सुनेत्रा पवारांना मिळालेले हे मताधिक्य आतापर्यंत देशातील सर्वाधिक मताधिक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या आधी उत्तर प्रदेशमधील सुनील कुमार शर्मा हे २०२२ साली २ लाख १४ हजार ८३५ मताधिक्याने विजयी झाले होते. सुनेत्रा पवारांनी त्यांचा विक्रम मोडला आहे.

@ बारामतीकरांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित आहे. बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानतानाच हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची..! या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया .

  • सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

राहुरीत कर्डिलेंचा मोठा विजय..

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी शानदार विजय मिळवला आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. अक्षय कर्डिले यांचा सामना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गोविंद मोकाटे यांच्याशी झाला होता. या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांना २६,९६१ मते मिळाली असून वंचित बहुजन आघाडीच्या संतोष चोळकेंना ५,५१८ मतं पडली

Comments are closed.