NGN News
Latest Marathi News

पंकजा राजेभाऊ देशमुख यांना पीएचडी पदवी प्रदान

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लोहोणेर : येथील कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संगणक शास्त्र येथे कार्यरत असलेल्या प्रा.पंकजा राजेभाऊ देशमुख यांना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी जयपुर यांच्याकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. पंकजा देशमुख या संगणक शास्त्र विभागात वीस वर्षापासून कार्यरत आहेत.त्यांनी केलेला संशोधनाद्वारे सॉफ्टवेअरमधील दोष (Bugs) धीच ओळखण्यासाठी Deep Learning आणि Convolutional Neural Network (CNN) या Artificial Intelligence Technology चा वापर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे सॉफ्टवेअर अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण बनण्यास मदत होईल. त्या लोहोणेर येथील रहिवासी असून श्री गुलाबराव बाबुराव देशमुख यांच्या सुष्ना व श्री वैभव गुलाबराव देशमुख यांच्या पत्नी आहेत.

Comments are closed.