NGN News
Latest Marathi News

मल्टी ऍसेट फंड कसे निवडायचे याचा करा पुनर्विचार : डीएसपी म्युच्युअल फंड

  • गुंतवणूकदारांच्या वास्तविक शोध वर्तनावर आधारित मोहिमेची गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीपूर्वी सहसा दुर्लक्षित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याच्या उद्देशाने आखणी

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क

डीएसपी म्युच्युअल फंडने मल्टी ऍसेट अलोकेशन या फंड श्रेणीसाठी नवीन डिजिटल मोहीम सुरू केली आहे. मल्टी ऍसेट अलोकेशन प्रकारातील फंडांमुळे अलीकडे मिळालेल्या परताव्यांचाच निव्वळ विचार करु नये, तर हे फंड पोर्टफोलिओमध्ये कोणती भूमिका बजावण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत, हा महत्वाचा मुद्दा गुंतवणूकदारांनी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याच्या दृष्टीकोनातून सदर मोहिम सुरू करण्यात आलेली आहे.

मल्टी ऍसेट अलोकेशन फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा झपाट्याने वाढत चालला आहे. आहे. परंतु हा फंड नेमका जे उद्दीष्ट समोर ठेवून तयार करण्यात आलेला आहे. त्यापेक्षा तो किती परतावा देणार, हा अतिशय वेगळाच दृष्टीकोन डोक्यात ठेवून ते या फंडात गुंतवणूकीसाठी संशोधन करत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले. हा मुख्य मुद्दा प्रकाशझोतात आल्यानंतर ही मोहिम सुरु करण्याची संकल्पना डिएसपीसमोर आली. ऍम्फीच्या अहवालानुसार, जानेवारी-मार्च २०२६ या तिमाहीत इक्विटीवर आधारित योजनांमध्ये झालेल्या एकूण निव्वळ गुंतवणुकीपैकी २७ टक्के गुंतवणूक ही मल्टी ऍसेट अलोकेशन फंडांमध्ये झालेली आहे. आधीच्या तिमाहीत २१ टक्के तर गेल्या वर्षी याच काळात अवघी सहा टक्के गुंतवणूकीच्या तुलनेत यंदा गुंतवणूक वाढली आहे. डीएसपी म्युच्युअल फंडमध्ये मल्टी ऍसेट अलोकेशन फंडांमध्ये व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तिप्पट झाली आहे.

एकीकडे गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असताना बहुसंख्य गुंतवणूकदार मल्टी ऍसेट अलोकेशन फंड नेमके कशासाठी आहेत, हा मुख्य मुद्दा समजून घेण्याआधीच, प्रामुख्याने केवळ अलीकडच्या काळात मिळालेल्या परताव्यांच्या आकडेवारीचा विचार करत या फंडांचे मूल्यमापन करण्यात गर्क असल्याचे डीएसपीला आपल्या सर्वेक्षणातून दिसून आले. परिणामी हे फंड ज्या हेतूने तयार करण्यात आलेले आहेत, त्या भूमिकेशी अजिबात जुळू शकणार नाहीत, अशा भरमसाठ अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत. शेअरबाजारातील प्रवाह अचानक बदलल्यावर एकतर गुंतवणूकदारांच्या पदरी निराशा येऊ शकते, अथवा ते निराशेपोटी वेळेआधीच आपली गुंतवणुक काढून घेण्याची शक्यता डिएसपीला दिसत आहे.

गुंतवणूकदार या फंडाकडे श्रेणीकडे कोणत्या दृष्टीकोनातून आकर्षित होत आहेत, हा मुद्दा अधिक योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी, डीएसपीने १०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांच्या शोधप्रश्नांचे विश्लेषण केले. त्यांचे प्रश्न वेगवेगळे असले तरी, ते प्रामुख्याने दोन वेगळ्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करत होते.

डिजिटल सर्च, मेट्रो आणि देशातील आघाडीच्या २० शहरांमधील डिस्प्ले जाहिराती, सोशल मीडिया आणि ऑडिओ प्लॅटफॉर्मवर ही मोहिम चालवली जाणार आहे. यामध्ये गुगल, मेटा, लिंक्डीन, एक्स, स्पॉटीफाय, रेड एफएम, रेडीट, टिकरटेप, आणि क्रेड यांचा समावेश आहे. गुंतवणूकदार ज्या क्षणापासून या फंडाविषयी शोध घेण्यास सुरुवात करतात, त्याच क्षणापासून त्यांच्याशी बंध निर्माण करणारा अनुभव तयार करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.

सदर मोहिमेबाबत भाष्य करताना डीएसपी म्युच्युअल फंडचे डायरेक्ट आणि इन्स्टिट्युशनल मार्केटिंगचे प्रमुख मनिष राठी म्हणाले, “गुंतवणूकदार मल्टी ऍसेट अलोकेशन फंड्सबाबत काय माहिती शोधत आहेत, याचे आम्ही विश्लेषण केले असता आम्हाला आढळले की, ते सगळे जण एकाच प्रकारचे उत्तर शोधत नव्हते. काही जण अलीकडील परताव्यांचे मूल्यमापन करत होते, तर अन्य काही गुंतवणूकदार हा फंड त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कसा समाविष्ट केला जाऊ शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. प्रत्येकाशी एकाच भाषेत बोलण्याऐवजी, आमचा संदेश या वेगवेगळ्या प्रारंभ बिंदूंचे प्रतिबिंब असावा, अशी आमची इच्छा होती. जर या मोहिमेमुळे गुंतवणूकदारांना अधिक चांगले प्रश्न विचारण्यास आणि मल्टी ऍसेट अलोकेशन फंड्स नेमके कोणत्या उद्दीष्टासाठी तयार करण्यात आलेले आहेत, याबद्दल अधिक वास्तववादी अपेक्षा ठेवायला मदत झाली, तर आमचा उद्देश खरोखर साध्य झाला, असे आम्हाला वाटते.”

Comments are closed.