
- गेल्या वर्षाच्या तुलनेत 142 टक्के अधिक आहे; झिंकच्या उत्पादन खर्चात घट झाल्यामुळे कंपनीचा त्रैमासिक ईबीआयटीडीए आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर
नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
जगातील सर्वात मोठी एकात्मिक जस्त (झिंक) उत्पादक आणि जागतिक स्तरावर चांदीच्या पहिल्या 10 उत्पादकांपैकी एक असलेल्या हिंदुस्तान झिंक लिमिटे’ने आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने 15,093 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक त्रैमासिक महसूल ऑपरेशन्सद्वारे मिळवला आहे, जो मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 77 टक्के अधिक आहे. कंपनीचा त्रैमासिक ईबीआयटीडीए 9,285 कोटी रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला असून त्यात वार्षिक आधारावर 108 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा त्रैमासिक निव्वळ नफाही 11,881 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला असून, यात 142 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीतील 271हजार टन (केटी) इतके सर्वाधिक ‘माइंड मेटल’ (खाणीतून काढलेली धातू) उत्पादन आणि 264 हजार टन (केटी) इतके विक्रमी ‘रिफाइंड मेटल’ (शुद्ध धातू) उत्पादन या कामगिरीच्या केंद्रस्थानी राहिले. याव्यतिरिक्त, रॉयल्टी वगळता जस्त उत्पादनाचा खर्च प्रति टन 703 अमेरिकन डॉलर्स इतका खाली आला आहे. दुसऱ्या तिमाहीत चांदीचे उत्पादन 173 टन इतके झाले, जे मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक असून, कंपनीच्या नफ्यात या उत्पादनाचा मोठा वाटा राहिला आहे.
30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या सहामाहीसाठी, हिंदुस्तान झिंकने वार्षिक 108 टक्के वाढीसह ₹17,359 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक ईबीआयटीडीए आणि ₹11,881 कोटींचा विक्रमी निव्वळ नफा नोंदवला, ज्यामध्ये उद्योगातील अग्रगण्य 60 टक्के ईबीआयटीडीए मार्जिनचा समावेश आहे. तिमाहीसाठी वाढीव भांडवली खर्चापूर्वीचा मुक्त रोख प्रवाह ₹6,389 कोटी होता, ज्यामुळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि कमी खर्चात झिंक उत्पादन करणारी कंपनी म्हणून तिचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.या तिमाहीत, कंपनीने कर्नाटकातील गुंडलूपेट दुर्मिळ मूलद्रव्य आणि यट्रियम ब्लॉकसाठी आशयपत्र (लेटर ऑफ इंटेंट) मिळवले, ज्यामुळे तिच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या विविधीकरणाला चालना मिळाली. एकूण वीज वापरामध्ये नवीकरणीय ऊर्जेचा वाटा 27 टक्के पर्यंत वाढला असून, कंपनीचा झिंक मिश्रधातू प्रकल्प आता 100 टक्के वीज या ऊर्जेतून मिळवतो.
या कामगिरीवर भाष्य करताना,मुख्य कार्यकारी अधिकारी अमरेन्दु प्रकाश म्हणाले,“या निर्णायक टप्प्यावर हिंदुस्तान झिंकचे नेतृत्व करण्याचा मान मिळाल्याबद्दल मला अभिमान वाटतो. दुसऱ्या तिमाहीत 271 हजार टन (केटी) खणून काढलेल्या धातूचे आणि 264 हजार टन (केटी) शुद्ध धातूचे विक्रमी उत्पादन, हे आमच्या कामकाजाची, मालमत्तेची आणि मनुष्यबळाची ताकद दर्शवते. आम्ही शिस्तबद्ध वाढ, कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित नवोन्मेष आणि ऊर्जा संक्रमणाला (एनर्जी ट्रांजिशन) पाठिंबा देण्यासाठी आमच्या महत्त्वपूर्ण खनिजांच्या पोर्टफोलिओला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, जेणेकरून भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करता येईल.”
Comments are closed.