शास्त्रशुद्ध पीक व्यवस्थापन उपायसुविधांच्या माध्यमातून गोदरेज ऍग्रोव्हेट द्राक्ष उत्पादकांना करतेय आणखी मजबूत

नाशिक: एनजीएन न्यूज नेटवर्क
गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या एकात्मिक कृषी व्यवसाय कंपन्यांपैकी एक असून शेतीपासून प्रथिनांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये कंपनीचा व्यवसाय विस्तारलेला आहे. कंपनीने नुकतीच नाशिक येथे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले. भारताच्या एकूण द्राक्ष निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा जवळपास 80% आहे. त्यामुळे उत्पादकता आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेली गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी पीक व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे ठरते. पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये फुलोरा कमी येणे, घडातील फुलांचे किंवा लहान फळांचे गळणे आणि फुलांवर कुज येणे यांसारख्या समस्यांचा फळांच्या विकासावर तसेच एकूण उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने गोदरेज ऍग्रोव्हेट संपूर्ण पीक चक्रादरम्यान योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देणाऱ्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) पद्धतीचा पुरस्कार करते. द्राक्ष पिकाच्या काळजीसाठी विकसित केलेल्या आपल्या उत्पादनांच्या श्रेणीअंतर्गत कंपनीने डायमोर कॉम्बाइन या द्राक्ष लागवडीसाठी विशेषतः विकसित केलेल्या होमोब्रॅसिनोलाइड (एचएमबी) आधारित उपायसुविधेवर भर देत आहे. पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर या उत्पादनाच्या वापराची शिफारस केली जाते. छाटणीनंतर 12-16 दिवसांनी पहिली फवारणी केल्यास घडांचा निरोगी विकास होण्यास मदत होते. छाटणीनंतर 28-30 दिवसांनी दुसरी फवारणी केल्याने फुलोऱ्याच्या टप्प्यात पिकाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, तसेच पिकाची गुणवत्ता आणि उत्पादनाची संभाव्य क्षमता जपण्यास हातभार लागतो.
शेतकरी मेळाव्याविषयी बोलताना गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडचे पीक संरक्षण व्यवसाय, धोरण आणि व्यवसाय विकास विभागाचे प्रमुख शिवराम यादवली म्हणाले, “द्राक्ष पिकाची छाटणी झाल्यानंतरचा कालावधी उत्पादन आणि गुणवत्ता निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना संशोधनावर आधारित पीक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यासाठी मदत करत आहोत. यामुळे घडांचा अधिक निरोगी विकास होण्यास, पिकाची प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता सुधारण्यास आणि शेतीतून अधिक चांगले परिणाम मिळवण्यास मदत होते. पिकाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर या उपायाच्या वापराची शिफारस केली जाते. छाटणीनंतर 12-16 दिवसांनी पहिली फवारणी आणि छाटणीनंतर 28-30 दिवसांनी दुसरी फवारणी केल्याने फुलोऱ्याच्या टप्प्यात पिकाचे आरोग्य चांगले राखण्यास आणि उत्पादनाची संभाव्य क्षमता जपण्यास मदत होते.”
द्राक्ष लागवडीच्या हंगामाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मदत करणे हा होता. यासाठी योग्य वेळी करावयाच्या उपाययोजना, पिकाच्या प्रत्येक टप्प्यानुसार आवश्यक असलेली निगा आणि पीक पोषणासाठी योग्य उत्पादनांचा वापर याविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमात माजी संचालक आणि मुख्य संशोधक डॉ. सोमकुवर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी छाटणीनंतरच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये द्राक्षवेलींचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींची माहिती दिली. तसेच पिकाच्या प्रत्येक टप्प्यानुसार योग्य वेळी आवश्यक ती निगा राखण्याच्या उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित केले.
गोदरेज ऍग्रोव्हेटने फुलोऱ्यापासून काढणीपर्यंतच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा समावेश असलेले सोपे पीक व्यवस्थापन वेळापत्रकही शेतकऱ्यांसमोर मांडले. जोडीला अस्सल आणि गुणवत्ता सुनिश्चित केलेल्या पीक निगा उत्पादनांचा वापर करण्याच्या महत्त्वावर कंपनीने भर दिला. शेतकऱ्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या कंपनीच्या ‘ट्रस्ट मार्क ऑफ क्वालिटी’ या उपक्रमाचीही माहिती देण्यात आली.
Comments are closed.