NGN News
Latest Marathi News

युद्ध थांबले हो ! अमेरिका-इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी

वॉशिंग्टन : एनजीएन न्यूज नेटवर्क

अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला संघर्ष अखेर थांबलाअसून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय वेळेनुसार आज सकाळी पाच वाजल्यानंतर इराणच्या वीज प्रकल्पांवर हल्ले करण्याचा आणि इराणला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला होता. मात्र दिलेल्या अल्टिमेटम पूर्वीच इराण आणि अमेरिकेमध्ये दोन आठवड्यांची सशर्त शस्त्रसंधी करण्यात येत अल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.

इराणचा दोन आठवडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. तर हल्ले थांबल्यास आम्हीही युद्ध थांबवू असं इराणचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे. इराणनं दिलेला 10 अटींचा मसुदा मान्य  करण्यासारखा असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याची अट अमेरिकेने घातली होती ही या अटीला इराणनेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. इराण हॉर्मुझ पूर्णपणे आणि लगेच खुलं करायला तयार झाल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शवली आहे. इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले. या युद्धविरामात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला. 

काय म्हटलेय ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये ?

मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ले आणि हल्ले थांबवण्यास सहमत आहे. हा द्विपक्षीय युद्धविराम असेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या माझ्या चर्चेनुसार आणि त्यांच्या विनंतीनुसार, मी आज रात्री इराणकडे पाठवण्यात येणारी विनाशकारी लष्करी शक्ती थांबवत आहे, परंतु अट अशी आहे की इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमती दर्शवावी. हे करण्यामागचे कारण असे आहे की, आम्ही सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत आणि त्याहूनही पुढे गेलो आहोत, आणि आम्ही इराणसोबत दीर्घकालीन शांततेसाठी आणि मध्य-पूर्वेतील शांततेसाठी एका ठोस कराराच्या अगदी जवळ आहोत. मला इराणकडून 10-कलमी प्रस्ताव मिळाला आहे, आणि आमचा विश्वास आहे की वाटाघाटींसाठी हा एक व्यवहार्य आधार आहे. अमेरिका आणि इराण जवळपास सर्व पूर्वीच्या विवादांवर सहमत झाले आहेत, परंतु कराराला अंतिम रूप देण्यासाठी आणि तो पूर्ण करण्यासाठी हा दोन आठवड्यांचा कालावधी आवश्यक आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्य-पूर्वेतील राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करत असताना, या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणे हा माझा सन्मान आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. 

Comments are closed.