NGN News
Latest Marathi News

अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ

  • जगदगुरु शांतिगिरीजी महाराज यांची उपस्थिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अमर आढाव
जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्त अंजनेरी गड येथे आठवडाभर जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या धर्म सोहळ्याचा शुभारंभ मोठ्या भक्तिपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा विकास व्हावा यासाठी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी (मौनगिरीजी) महाराज गेल्या २५ वर्षांपासून अंजनेरी गड येथे प्रतिवर्षी आठवडाभर जपानुष्ठान,महायज्ञ,नामजप,श्रमदान यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करतात.याहीवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याचा जोरदार शुभारंभ झाला. प्रथम ध्वजारोहण संपन्न झाले.पालखी पूजन करण्यात आले. जपानुष्ठानास बसणाऱ्या साधकांच्या विविध व्रत व मौनव्रताचा प्रारंभ झाला.

या सोहळ्या दरम्यान जपानुष्ठान,महायज्ञ, हस्त लिखित नामजप,अखंड नंदादीप,रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्य नियम विधी, आरती, सत्संग, प्रवचन, प्राणायाम, ध्यान, श्रीमद एकनाथी भागवत वाचन यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने अंजनेरी गड परिसरात श्रमदानही होणार आहे.उपस्थित भाविकांना जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.

Comments are closed.