NGN News
Latest Marathi News

अंजनेरी गडावर जपानुष्ठान सोहळ्याची उद्या सांगता

  • हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

** अमर आढाव
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव निमित्त अंजनेरी गड येथे आठवड्याभरापासून सुरू असलेल्या जपानुष्ठान सोहळ्याची सांगता अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत उद्या गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी होणार आहे.यावेळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर पाच वाजता नित्य नियम विधी,आरती,सत्संग,भागवत वाचन,भजन,नामस्मरण,ध्यान याबरोबरच श्री हनुमान जन्मोत्सव अंजनेरी गडावर साजरा करण्यात येणार आहे.

श्रीराम भक्त हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा विकास व्हावा यासाठी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी (मौनगिरीजी) महाराज गेल्या २५ वर्षांपासून अंजनेरी गड येथे प्रतिवर्षी आठवडाभर जपानुष्ठान,महायज्ञ,नामजप,श्रमदान यांसह विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करतात.याहीवर्षी हनुमान जन्मोत्सवानिमित्त अंजनेरी गडावर गेल्या आठवड्या भरापासून जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्या दरम्यान जपानुष्ठान,महायज्ञ, हस्त लिखित नामजप,अखंड नंदादीप,रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर नित्य नियम विधी,आरती,सत्संग,प्रवचन,प्राणायाम, ध्यान, श्रीमद एकनाथी भागवत वाचन यांसह विविध कार्यक्रम संपन्न झाले.या संपूर्ण सोहळ्याची व साधकांच्या मौनव्रताची सांगता गुरुवार दि. २ एप्रिल रोजी होणार आहे.

Comments are closed.