NGN News
Latest Marathi News

खरातची केस लढण्यास सरकारी वकिल अजय मिसर यांची ‘ना’

  • इतर अनेक खटल्यांच्या व्यापामुळे व्यक्त केली असमर्थता

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अवघा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. सरकारी वकील अजय मिसर यांनी खरातविरोधात एसआयटीची केस लढण्यास असमर्थता दर्शवली आहे. एसआयटीने विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना ही केस चालवण्यासाठी लेखी पत्राद्वारे विनंती केली होती. तथापि, 2011 मुंबई साखळी बॉम्ब स्फोट खटला, रवी पुजारी प्रकरणातील इतर सर्व खटले तसेच अन्य महत्वाच्या खटल्याच्या न्यायालयीन चौकशीच्या कामामुळे या प्रकरणाला वेळ व न्याय देता येणार नसल्याने अजय मिसर यांनी केस चालवण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मिसर यांच्या या भूमिकेनंतर सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे हे युक्तिवाद करणार आहेत.

दुसऱ्या घडामोडीत अशोक खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती उघडकीस आली असताना वर्षाला तो केवळ बारा लाखांचे उत्पन्न दाखवून आयकर भरत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा देखील आयकर विभागाला संशय आहे. या अंगाने देखील खरात चौकशीच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता गडद झाली आहे.

Comments are closed.