NGN News
Latest Marathi News

झिरवाळ यांच्या व्हायरल कथित व्हिडीओवर मुख्यमंत्र्याचा ‘हा’ पवित्रा 

मुंबई : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासंबंधी व्हायरल होणाऱ्या कथित व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा दोन तीन व्हिडीओ एकत्रित जोडून तयार केल्याचा दावा झिरवाळांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओची शाहनिशा करून सत्यता तपासली जाईल आणि मग निर्णय घेऊ असे स्पष्ट केले आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी होत आहे. राष्ट्रवादीतील एका गटासह शिवसनेच्या नेत्यांनीही झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले, नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितले की, तो व्हिडीओ दोन-चार व्हिडीओ एकत्रित जोडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर या विषयी तात्काळ तक्रार दाखल करा, या व्हिडीओची शाहनिशा करण्यात येईल असा आपण सल्ला दिला.

आधी लाचखोरी, आता व्हिडीओ प्रकरण

एफडीए विभागातील लाचखोरी प्रकरणामुळे झिरवाळ या आधी अडचणीत आले होते. त्या प्रकरणात नरहरी झिरवाळांचा कोणताही हात नसल्याचं अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर नरहरी झिरवाळ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.

Comments are closed.