
- अटकपूर्व जमीन अर्जावरील निकाल नाशिक रोड न्यायालयाने राखून ठेवला
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर यांमुळे राज्यभर गाजत असलेल्या टीसीएस प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जमीन अर्जावरील निकाल नाशिक रोड न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्यासंदर्भातील सुनावणी आता येत्या 2 मे रोजी होणार आहे.
नाशिक रोड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. निदा खान हिच्यावातीन विधिज्ञ राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला, सरकारी वकील अजय मिसर यांनी पोलिसांची बाजू मांडली. मिसर यांनी जामिनाला सक्त विरोध केला. एसआयटी प्रमुख संदीप मिटके हेदेखील उपस्थित होते.
या संदर्भात देवळाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच दोन संशयित दानिश शेख आणि तौसीफ अत्तार यांना अटक केली आहे. तथापि , या प्रकरणात आरोपीना चिथावणी देणारी निदा खान अद्यापही पोलिसांना गुंगारा देत आहे. सदर गुन्ह्यात अत्रोसिटीचे अतिरिक्त कलम लावण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. निदा खान हिला जामीन मिळणार की तिला तुरुंगाची हवा खावी लागणार याचा फैसला येत्या 2 मे रोजी होणार आहे.
Comments are closed.