
- मणक्याला गंभीर दुखापत; लेकाने फोडला हंबरडा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आडगाव परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात लिफ्ट अपघात होवून एक महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. ज्योती शिवाजी आहिरे (५०, रा. मानेनगर, पंचवटी) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मविप्र संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी तत्वावर कार्यरत ज्योती आहिरे ह्या साफसफाईचे काम करत होत्या. आहिरे यांना लिफ्टचा दरवाजा उघडा दिसल्याने कुतूहलापोटी त्या लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावून पाहत असतानाच अचानक वरच्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली. लिफ्टचा तडाखा बसल्याने ज्योती आहिरे यांचे डोके आणि मान लिफ्टमध्ये अडकली. या भीषण दुर्घटनेत त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. लिफ्टचा दरवाजा उघडा कसा राहिला आणि तांत्रिक बिघाड होता का, याची तपासणी आता केली जात आहे. दरम्यान, आहिरे यांच्या मुलाने गंभीर अवस्थेतील आईला बघून अक्षरशः हंबरडा फोडला.
Comments are closed.