
- १८ पिकांची लागवड: जीवामृत व दशपर्णी अर्काची होणार निर्मिती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
ओझर : अमर आढाव
कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांनी भाविकांना आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाबरोबतच ‘कृषी सेवा’ आणि ‘श्रम’ संस्काराची शिकवण दिली आहे. त्यांचाच याच विचारांना गती देण्यासाठी उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सकस आणि विषमुक्त ’अन्न निर्मिती’या उद्देशाने कार्यारंभ झाला आहे.ओझर येथील जनशांतीधाम येथे नैसर्गिक शेती या प्रकल्पाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना “कामात राम” ही दिव्य शिकवण दिली. उत्तमशेती,भूमातेची सेवा करा असा संदेश त्यांनी दिला.त्यांनी भाविकांना आध्यात्मिक मार्गाबरोबरच समप्रतिष्ठेची शिकवण दिली.त्यांची हीच परंपरा पुढे नेण्यासाठी उत्तराधिकारी जगदगुरु अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज अविरत परिश्रम घेत आहे.नैसर्गिक शेती करण्याची शिकवण देण्यासाठी “आधी केले मग सांगितले” या प्रमाणे त्यांनी ओझर येथील जनशांती धाम येथील आपल्या आश्रमात सेंद्रिय शेतीसाठी प्रकल्प शुभारंभ केला.या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल १८ प्रकारच्या विविध पालेभाज्या आणि फळभाज्यांची लागवड करण्यात येणार आहे. संपूर्णपणे रासायनिक खते आणि कीटकनाशके टाळून केवळ नैसर्गिक निविष्ठा तयार करून त्याचा वापर येथे केला जाणार आहे. केवळ लागवडच नव्हे,तर जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि पिकांच्या वाढीसाठी आश्रमातच जीवामृत आणि दशपर्णी अर्काची निर्मिती केली जात आहे. देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि स्थानिक वनस्पतींचा वापर करून तयार केलेले हे नैसर्गिक घटक जमिनीला सुपीक बनवण्यास मदत करणार आहेत.
एकूण १८ प्रकारच्या पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सरी पद्धतीने लागवड करण्यात येत असून कोबी, फ्लॉवर, बीट, भांडी,पालक, कोथिंबीर, करडई, शेपू, यासह सापळा पिके म्हणून मधू नका, झेंडू यांची लागवड करण्यात आली.याशिवाय गिलके, दुधी, कारली,शेवगा,पपई, घेवडा व चवळी या पिकांचा समावेश आहे.या प्रकल्पाची सुरुवात करताना भाजीपाला लागवडप्रसंगी आश्रमीय संत स्वामी कमलगिरीजी महाराज, ज्ञानेश्वर भुसे, ज्योती भुसे आकाश दळवी, गणेश चव्हाण,मुकुंद पिंगळे,व्यवस्थापक संतोष अनवट,सार्थक शिवपुरी,चिन्मय शिवपुरी आदी उपस्थित होते.
——-
भूमातेची सेवा,विषमुक्त शेती..
जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी नेहमीच आपल्या भाविकांना भूमातेची सेवा करण्याची शिकवण दिली. उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज त्यांच्या प्रेरणेतून आश्रमाचे स्वयंसेवक श्रमदानातून शेती फुलवत आहेत.”विषमुक्त अन्नाची कास धरा” हा संदेश या प्रकल्पाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवला जात आहे.या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण होत असून, नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांनाही यातून प्रोत्साहन मिळणार आहे.
—–
शेती केवळ व्यवसाय नसून ती एक साधना आहे. जेव्हा शेतकरी नैसर्गिक पद्धतीने पीक घेतो, तेव्हा त्यातून मिळणारे उत्पन्न सात्विक असते,जे समाजाच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला सुदृढ आरोग्य देण्यासाठी नैसर्गिक शेती काळाची गरज आहे,भक्त परिवाराच्या प्रत्येक आश्रमात सेंद्रिय शेती सुरू करण्यात येणार आहे.
–जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज
जय बाबाजी भक्त परिवार,भारत
Comments are closed.