NGN News
Latest Marathi News

३२ वी राष्ट्रीय मास्टर्स टेटे स्पर्धा; नाशिकचे ‘सप्तक’ महाराष्ट्र संघात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : बालेवाडी, पुणे येथे सुरु असलेल्या ३२ व्या मास्टर्स राष्ट्रीय अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी झालेल्या विविध वयोगटाच्या महाराष्ट्र संघात नाशिकच्या सात पुरुष व महिला खेळाडूंचा समावेश आहे. सदर स्पर्धा ४ मे पर्यंत चालणार आहे.

७० वर्षाहून अधिक पुरुष वयोगटात शिवानंद कुंडाजे यांचा महाराष्ट्र ‘अ’ संघात निवड झाली असून त्यांच्यावर कर्णधार पदाची जबाबदारी ही सोपवण्यात आली. ६५ वर्षावरील वयोगटाच्या पुरुष महाराष्ट्र ‘अ’ संघात उमेश कुंभोजकर यांची निवड झाली. तसेच त्यांना पिनाक शालिग्राम यांची ४५ वर्षावरील वयोगटाच्या महाराष्ट्र पुरुष ‘अ’ संघात निवड झाली तसेच ८० वर्षावरील वयोगटाच्या महाराष्ट्र ‘अ’ संघात सतीश शिरसाट यांची निवड झाली. ६० वर्षावरील महिला महाराष्ट्र ‘अ’ संघात स्वाती आघारकर यांची निवड झाली. ६५ वर्षावरील महिलांच्या महाराष्ट्र ‘ब’ संघात ज्योती कुलकर्णी व रोहिणी सहस्रबुद्धे यांची निवड झाली.

यांच्या या निवडीबद्दल नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष राजेश भरवीरकर व मिलिंद कचोळे, सचिव शेखर भंडारी, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, संजय वसंत, वैभव जोशी, अलका कुलकर्णी यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.