NGN News
Latest Marathi News

आधी ऑफिसबॉय, आता कुक खरातच्या मुळावर; काळ्या कृत्यांचा भंडाफोड

  • फार्महाऊसवरील संशयास्पद सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महिला लैंगिक शोषण, बेनामी मालमत्ता आणि भक्तांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरात याचा पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे. कारण खरातच्या कार्यालयीन ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर कार्यरत स्वयंपाक्याने ( कुक ) खरातच्या काळ्या कृत्यांचा भांडाफोड केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका सीएने संबंधित कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, खरातच्या मिरगाव येथील फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती लागले आहे. सदर व्हिडिओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे दिसून येत असून यामुळे त्याच्या विरोधातील लैंगिक शोषणाचे गुन्हे अधिक प्रबळ झाले आहेत. एका सीएनेच कुकला फार्महाऊसवर तैनात करून खरातचे सर्व कारनामे उघड केले आहेत.  या संशयास्पद व्हिडिओतून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता गडद झाली आहे.

‘आठवत नाही’ ची बतावणी

दरम्यान, अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून एसआयटी द्वारा त्याची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, तो ‘ आपल्याला काहीच आठवत नाही’ अशी बतावणी करून तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती समोर येत आहे. आधी प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता विस्मरणाचे नाटक करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

Comments are closed.