NGN News
Latest Marathi News

 आक्षेपार्ह मॅसेजने तरुणींचा विनयभंग; नेटचा पासवर्ड अश्लील नावाने

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : येथील टीसीएस लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. टीम लीडर रजा मेनन आणि आसिफ अन्सारी यांच्याकडून हिंदू मुली आणि महिलांचा सातत्याने छळ होत होता. तपास यंत्रणेकडून याबाबत अधिकचा तपास सुरू आहे. 

एसआयटीने संशयित आरोपींकडून मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलमधून व्हॉट्सअॅप ग्रुपबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. ग्रुप लीडर ग्रुपमधून दररोज वेगवेगळे आक्षेपार्ह मॅसेजेस करून तरुणींचा विनयभंग करत, अशी माहिती आली आहे. हिंदू तरुणी आणि महिलांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक छळवणूक करण्याचा प्रयत्न सुरु होता.

ऑफिसमध्ये दररोज नेटचा पासवर्ड अश्लील नावाने किंवा हिंदू मुलींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने सेट केले जात असल्याचे प्रकार समोर आला आहे. शफी शेख आणि रझा मेमन यांच्या मोबाईलमधील काही डेटा डिलीट केल्याचीही शंका उपस्थित होत आहे. 

Comments are closed.