
- अशोक खरात, पतसंस्था व्यवस्थापनावर सिन्नरला गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सिन्नरमधील पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती उघडून लाखो रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात आणि पतसंस्था व्यवस्थापनावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत अशोक खरात याने आपल्या नावावर ३२ बनावट खाती उघडल्याची तक्रार एका तक्रारदाराने सिन्नर पोलिसांत दिली. संबंधित खात्यांमधून तब्बल 57 लाख 90 हजार 979 रुपयांचा अपहार केल्याचेही त्याने तक्रारीत म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार, 2016 ते 2023 या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तक्रारदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाचा वापर करून पतसंस्थेत बनावट खाती उघडण्यात आली होती. या खात्यांच्या माध्यमातून उपरोक्त रकमेची अफरातफर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी अशोक खरातसह पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments are closed.