NGN News
Latest Marathi News

बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषणासोबत धर्मांतरासाठी तरुणींचे ‘ब्रेनवॉश’

  • कंपनीतील टोळीचे कारनामे; ‘विशिष्ट’ तरुणींची मदत घेतल्याचीही माहिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरातील बहुचर्चित बहुराष्ट्रीय कंपनीत लैंगिक शोषणासोबत तरुणींचे पद्धतशीरपणे ब्रेनवॉश करून त्यांचे धर्मांतर करण्याचा कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. दरम्यान. पुण्यात पसार झालेली कंपनीची एचआर प्रमुख आश्विनी अशोक चैनानी हिला एसआयटीने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकाशिनानातर तीला तूर्तास सोडण्यात आले.

धक्कादायक बाब म्हणजे यामधील संशयित आरोपींनी कंपनीतीलच काही तरुणींची मदत घेत हिंदू तरुणींशी जवळीक साधून इप्सित्प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला. या तरुणी हिंदू तरुणींना हेरून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत. अशाच एका पीडित तरुणीच्या बाबतीत अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. संशयित आरोपींनी पीडितेवर अशा प्रकारे प्रभाव टाकला होता की तिने सलग दोन वर्षे महिना-महिनाभर उपवास पकडण्यास सुरुवात केली होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी बोलावले तरी ती स्पष्ट नकार देत असे.  पीडितेने गेल्या वर्षापासून ‘लिप्स्टिक’ लावणेही पूर्णपणे बंद केले होते. संशयित दानिश हा विवाहित असल्याचे पीडितेला तिच्या हिंदू टीम लीडरने अनेकदा सांगूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

एचआर प्रमुखची कसून चौकशी

दुसरीकडे. कंपनीची एचआर प्रमुख आश्विनी अशोक चैनानी ही आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर पुण्यात पसार झाली होती. एसआयटीने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर तिला कायदेशीर नोटीस देऊन सध्या सोडण्यात आले आहे. या रॅकेटमध्ये कंपनी प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा किती सहभाग होता? याचा तपास आता पोलीस करत आहेत. यासाठी कंपनी परिसरातील सुमारे 40 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

‘त्या’ दबलेल्या प्रकरणाची चर्चा

एका हिंदू तरुणीला आणि संशयित तरुणाला कंपनीच्या टेरेसवर आक्षेपार्ह स्थितीत कर्मचाऱ्यांनी पकडले होते. हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद होऊनही, वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने ते प्रकरण दाबून टाकण्यात आले होते. या छळाला कंटाळून अनेक तरुणींनी यापूर्वीच नोकरी सोडल्याचे देखील समजते.   

Comments are closed.