
- विकृत कारनाम्यांचा पुराव्यासह 160 जीबी डेटा हस्तगत
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदू अशोक खरात याच्या भोवती कारवाईचा फास अधिक घट्ट होणार असल्याची चिन्हे आता गडद झाली आहेत. कारण त्याच्या कारनाम्यांचे डिजिटल पुरावे ‘एसआयटी’च्या हाती लागले आहेत. खरातच्या विकृत कारनाम्यांचा तब्बल 160 जीबी डेटा कोडवर्डसह हस्तगत करण्यात आला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 कालावधीतील हालचालींचा तपशील खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त करण्यात आला आहे. 32GB क्षमतेचे तसेच 19 फोल्डर डेटा असणारे 3 पेन ड्राईव्ह तसेच 64GB क्षमतेचे OTG पेन ड्राइव्ह आणि लॅपटॉपसह सर्व डेटा SIT कडून स्कॅन करण्यात येत आहे. फोरेन्सिक आणि सायबर टीम कडून सबळ डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. न्यायालयात पुरावे सादर करण्यासाठी एसआयटी (SIT)ने साक्षीदार आणि पिढीताचे जबाबही नोंदविण्यात आले आहे. वेगवेगळ्या अशा एकूण १६० जीबीच्या डिजिटल पुराव्यांमध्ये खरातचे हे काळे कारनामे दडले आहेत.
काळे कारनामे न्यायालयाच्या निदर्शनास
प्रत्येक डिजिटल पुराव्यावर पोलिसांनी ए, बी, सी नावाचे कोडवर्ड दिले असून, त्यात ए म्हणजे खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे पुरावे असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर उपरोक्त कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयात केले गेलेले काळे कारनामे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. दरम्यान, नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने खरात याला पाच दिवसांची कोठडी गुरुवारी सुनावली आहे. या सुनावणीत खरातने पीडितेला कसे आपल्या जाळ्यात ओढले, हे सांगताना खरातने तुला मुलगाच होईल, असे सांगत गर्भवतीला संबंध ठेवायला भाग पडल्याचा आरोप वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने खरातला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Comments are closed.