NGN News
Latest Marathi News

खरातच्या अश्लील व्हिडिओची अत्यल्प मोबदल्यात विक्री

सायबर विभागाच्या लेखी पीडितांची ओळख गोपनीयतेचा भंग करणारी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या कथित अश्लील व्हिडीओंची 15 ते 20 रुपयांना विक्री करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये तर हे व्हिडिओ पाहण्यास इच्छुक असलेल्या लोकांकडून प्रति व्हिडिओसाठी 20 ते 50 रुपये आकारले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पैसे भरल्यानंतर, ते व्हिडिओ इच्छित लोकांना पाठवले जात होते. मात्र या व्हिडिओंच्या प्रसारामुळे अनेक पीडितांची ओळखही उघड झाली असून, त्यांच्या गोपनीयतेवर गंभीर परिणाम झाला आहे असं पोलिसांनी सांगितले. याच प्रकरणी आता सायबर विभागातर्फे दाखल गुन्हा करण्यात आला आहे.

या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी महाराष्ट्र सायबर प्रमुख यशस्वी यादव यांनी दिली. अशोक खरात आणि इतर काही सोशल मीडिया अकाऊंट विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच या संदर्भात आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

15 ते 17 अश्लील व्हिडिओ व्हायरल..

खरात याने नाशिकमधील कार्यालयात अनेक महिलांचे शोषण करीत लैंगिक अत्याचार केले. हव ओरकार तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्याचे अश्लील व्हिडीओही व्हायरल झाले होते. महाराष्ट्र सायबर सेलने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी अशोक खरात आणि पीडितांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या चार वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंक्सद्वारे हे व्हिडिओ प्रसारित केले जात होते, त्याविरोधात तपास यंत्रणेने गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू अशोक खरातशी संबंधित 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते.

Comments are closed.