
- धार्मिक भावना दुखावल्याचा देखील आरोप; एकूण नऊ गुन्हे दाखल
- सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात भोंदूबाबा अशोक खरात आणि ‘एनजीओ’ चालक रवींद्र एरंडे यांचे प्रताप बाहेर येत असतानाच एका नव्या धक्कादायक प्रकाराची उकल झाली आहे. एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर लैंगिक आणि मानसिक अत्याचार तसेच विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहरात एकूण नऊ गुन्हे दाखल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक पोलिसांनी या बाबीची गंभीर दाखल घेत सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या नव्या प्रकाराने शहरभर खळबळ उडाली असून नेमक्या कोणत्या ठिकाणी हा प्रकार झाला, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर कंपनीत धार्मिक भावना दुखावल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. चार विनयभंग, तीन धार्मिक भावना दुखावणे, एक बलात्कार असे एकूण नऊ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून विशेष तपास पथकाची ( एसआयटी ) ची स्थापना करण्यात आली आहे. सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्या नेतृत्वाखाली त्याचा तपास सुरु आहे. एका माहितीनुसार, शहरातील सर्व आस्थापनांना महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पिडीत महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांनी ९१२३२३२३११ हा हेल्पलाईन क्रमांक जारी करताना कंट्रोल रूम येथे १२२ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदाराचे नाव कोणत्याही परिस्थितीत गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
Comments are closed.