NGN News
Latest Marathi News

खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; खंडणीखोरांना बेड्या

  • व्यावसायिकाला धमकावणारी चौकडी जेरबंद

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : व्यावसायिकाच्या टॅबमधील खासगी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बारा लाखांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांना पोलीस पथकाने सापळा रचून अटक केली. पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपये स्वीकारताना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाचे आपल्याच कार्यालयातील मैत्रिणीसोबत असलेले खासगी फोटो आणि व्हिडीओ असलेला टॅब चोरीस गेला होता. त्यामधील फोटोच्या आधारे संशयितांनी व्यावसायिकाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत बारा लाखांची खंडणी मागितली. व्यावसायिकाने याबाबत तक्रार केल्यानंतर सातपूर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिट २ च्या पथकाने सापळा रचला. पहिला हप्ता देण्यासाठी व्यावसायिकाला जिथे बोलावले होते, तिथे पोलीस असल्याचा सुगावा लागल्याने खंडणीखोरांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आता पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Comments are closed.