NGN News
Latest Marathi News

पिंपळगाव येथे जनेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन उत्साहात

  • जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांचे जंगी स्वागत ; हजारो भाविकांची उपस्थिती

ओझर : एनजीएन न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत येथील श्री जनेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन सोहळा अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीने लक्षवेधी ठरला.हा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण,भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. ढोल ताश्याचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य पुष्पहार व भरभरून पुष्पवृष्टी करत जगदगुरु बाबाजींचे भाविकांनी जंगी स्वागत केले.

पिंपळगाव येथील अंबिका नगर परिसरात श्री जनेश्वर महादेव मंदिराचा बारावा वर्धापनदिन अनंत विभूषित श्रीमद जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ लक्षवेधी पालखी मिरवणुकीने करण्यात आला.मिरवणुकीत जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभल्याने भाविकांचा प्रचंड उत्साह वाढला.

यानंतर आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर आश्रमीय संत श्री महंत १०८ स्वामी परमेश्वरगिरीजी महाराज, श्री महंत १०८ स्वामी जनेश्वरगिरीजी महाराज,स्वामी कमालगिरीजी महाराज, हृदयानंद माऊली, प्रतिजेजुरीचे गुरुवर्य योगेश महाराज गवारे,आमदार दिलीपकाका बनकर,पिंपळगावचे नगराध्यक्ष डॉ.मनोज बर्डे,माजी सरपंच भास्करराव बनकर,नगरसेवक गणेश बनकर,रामराव (आण्णा) डेरे, चंद्रकांत बनकर, ज्ञानेश्वर बनकर,डॉ.अश्विन मोरे,डॉ.रोहन मोरे यांसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

Comments are closed.