NGN News
Latest Marathi News

खरातच्या ‘शिवनिका’ संस्थानचे आर्थिक व्यवहार एसआयटीच्या रडारवर

  • रुपाली चाकणकर यांच्यासह सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या आधिपत्याखालील ‘शिवनिका’ संस्थेचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवनिका संस्थानच्या सर्व आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. एसआयटी सर्व आजी माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती आहे.

‘शिवनिका’ संस्थेच्या माध्यमातून अनेक आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम पार पडले होते. या संस्थेवर विविध वेळी कार्यरत असलेल्या सर्व आजी-माजी सदस्यांची आता एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या सदस्यांना लवकरच चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असून, संस्थेच्या निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ यावर पोलीस लक्ष केंद्रित करत आहेत. खरातशी असलेल्या कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर, एसआयटी आता चाकणकर यांचीही चौकशी करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना चौकशीला उपस्थित राहण्याबाबतचे समन्स धाडण्यात आले असून, त्यांचे जबाब नोंदवले जाऊ शकतात.

‘शिवनिका’ संस्थेचे बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे एसआयटीकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. या संस्थेच्या नावाखाली नेमका कोणता पैसा कुठे वळवण्यात आला आणि यामध्ये कोणत्या बड्या व्यक्तींचा सहभाग होता, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. 

शिवनिका संस्थानचे विश्वस्त मंडळ असे : कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात, डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके, कल्पना अशोककुमार खरात, रूपाली निलेश चाकणकर, सुभाषराव केशवराव गमे, ललित प्रकाश गोफणे (C.A.) आणि डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे

Comments are closed.