
पीडित महिलांना सोबत घेवून एसआयटी, फॉरेन्सिक टीमने कसून तपासणी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात आज पुन्हा एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कसून तपासणी केली. विशेष म्हणजे यावेळी काही पीडित महिलांना सोबत नेण्यात आले. आजच्या तपासणीत औषधाची बाटली, विविध प्रकारच्या आकारांचे खडे आणि इतर वस्तू आढळून आल्या. या सर्व वस्तू एसआयटीने जप्त केल्या.
आज दुपारच्या सुमारास पीडित महिलांना घेऊन एसआयटी खरातच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा घटनाक्रम जाणून घेत मोबाईलमध्ये लाईव्ह स्क्रीनिंग केले. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह एसआयटीने डिजिटल पंचनामा केला. खरातने याच कार्यालयात 150 हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केले. पीडित महिलांचे कुठे लैंगिक शोषण केले, याबाबतची माहिती देखील एसआयटीकडून जाणून घेण्यात आली.
शस्त्र परवाना नोंदीविना
दरम्यान, अशोक खरात याच्याबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. खरातला दिलेल्या शस्त्र परवान्याची ग्रामीण पोलिसात 12 वर्षांत नोंदच नाही. त्याला शस्त्र परवाना दिल्याची ग्रामीण पोलिसांनाच माहिती नसल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने परवाना दिल्यानंतर ग्रामीण पोलीसांना माहिती देणे बंधनकारक असताना अशी कोणतीही माहिती नाही. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अत्यंत कठोर प्रक्रिया असताना खरातला हा परवाना नेमक्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे मिळाला, याबाबत सारेच अनभिज्ञ आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनडीएएल एएलआयएस ऑनलाइन प्रणालीमध्ये या परवान्याची नोंद नसल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक पोलीस स्टेशन सुद्धा अनाभिज्ञ, तत्कालीन तहसीलदार प्रांत अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Comments are closed.