NGN News
Latest Marathi News

झेडपी निवडणुकांना डिसेंबरचा मुहूर्त ? राज्य सरकारची तयारी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुका येत्या डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता गडद झाली आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात तशी तयारी दर्शविल्याने मिनी मंत्रालयातील नव्या कारभाऱ्यांचा शोध संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय अंतिम निर्णय घेणार? याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवडणुका घेण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडल्यामुळे गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर गती मिळण्याची चिन्हे आहेत. आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय अंतिम निर्णय घेणार? याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.