NGN News
Latest Marathi News

सेवाभावी वृत्तीने केलेले काम एकप्रकारे अध्यात्मच : गोरवाडकर

स्व प्रतापराव वाढणे व्याख्यानमालेत प्रतिपादन

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : कुठल्याही प्रकारची सेवा केली तरी ती परमेश्वर पर्यंत पोहचते, मग त्यात उपासनाच केली पाहिजे असे नाही, तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे अथवा सेवाभावी वृत्तीने केले तर ते एक प्रकारचे सेवेतील अध्यात्मच आहे. असे प्रतिपादन सा. नगाराचे संपादक, लेखक डॉ विनोद गोरवाडकर यांनी केले. एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष स्व. प्रतापराव वाढणे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते.

‘सेवेतील अध्यात्म’ या विषयावर बोलतांना ते म्हणाले सुख ही सहा प्रकरायची असतात, ही सहा सुख विषद करताना ते म्हणाले उत्तम जोडीदार मिळणे, उत्तम संतती प्राप्त होणे, योग्य संपत्ती असणे. उत्तम आरोग्य लाभणे, नावलौकिक असणे. व सेवा भावातून मिळणारे समाधान या सहा सुखाच्या व्याख्या त्यांनी व्याख्यानात रसीकांना सोदाहरण समजून सांगितले.

यावेळी मंडळाच्या अध्यक्षा अहिल्याताई यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे सचिव सुधाकर भोई यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ सौ. नंदिनी पगार यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सतीश जोशी यांनी केले, तर आभार मंडळाचे सदस्य विनायक सुर्यवंशी यांनी माधले, यावेळी यशवंत अहिरे, शोभा भुसाळ, अंजली वाघमारे, राजेंद्र वाघमारे, वैशाली मुठे, रेणू वाढणे परिसरातील बहुसंख्य नागरीक व्याख्यानास उपस्थित होते.

Comments are closed.