NGN News
Latest Marathi News

म्हाडा भूखंड घोटाळ्यात पोलिसांकडून नायब तहसीलदारास अटक

  • बनावट कागदपत्रात फेरफार नोंदी केल्याचा आरोप; तीन दिवसांची कोठडी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : येथील बहुचर्चित म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील ४९ पैकी ३१ प्रकरणांत बनावट कागदपत्रात फेरफार नोंदी केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी नायब तहसीलदार नितीन पाटील यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने पाटील यांना त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.

पाटील हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार ( प्रशासन ) या पदावर कार्यरत आहेत. म्हाडा भूखंड घोटाळ्यात त्यांनी हेरफार केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु असतानाच आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, पाटील यांना कोर्टात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील यांच्यावरील कारवाईमुळे महसूल विभाग तसेच बिल्डर्स लॉबी धास्तावली आहे. या प्रकरणात आणखी काही नवे पुढे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.