NGN News
Latest Marathi News

शीरखुर्मा, पेयांतून गुंगीकारक पदार्थ मिसळून अत्याचार

  • टीसीएस प्रकरणात तपास यंत्रणेकडे धक्कादायक माहिती

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनी प्रकरणातील संशयित आरोपींनी पीडित महिलांना शीरखुर्मा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगीकारक पदार्थ मिसळून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पुरावे तपास यंत्रणेकडे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

मल्टिनॅशनल कंपनी प्रकरणातील संशयित आरोपींच्या एसआयटी चौकशीत धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कंपनीमध्ये पीडित तरुणी आणि महिलांना शीरखुर्मा खाण्यासाठी देऊन त्यांचे मनपरिवर्तन घडवून धर्मांतर करण्याचा आरोपींचा प्रयत्न सुरू होता. कंपनीमधील तरुणी आणि महिलांचे धर्मांतर षडयंत्र करून लैंगिक शोषण करण्यासाठी काही फंडिंग होत असल्याचे काही पुरावे एसआयटी पथकाला आढळले असल्याची माहिती आहे.

धर्मांतरासाठी फंडिंगचा संशय

दरम्यान, कंपनीतील कर्मचाऱ्यांना धर्मांतर करण्यासाठी उद्युक्त केल्याच्या तक्रारी लक्षात घेवून एसआयटीला बाह्य फंडिंगचा संशय आहे. त्या दिशेने तपास सुरु झाल्याचेही सांगण्यात येत आहे. संशयितांनी वापरलेले laptop, संगणकय वेब हिस्ट्री आणि तत्सम साहित्य त्या अंगाने तपासण्यात येणार आहेत. शिवाय संशयितांच्या बँक खात्यांचे विवरणपत्र तपासून त्यामध्ये बाह्य व्यवस्थेकडून काही फंडिंग झाले का, याची तपासणी करण्यात येणार आहे. न्यायालयाने चारही संशयितांच्या कोठडीत ५ मे पर्यंत वाढ केल्याची माहिती विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी दिली.

Comments are closed.