NGN News
Latest Marathi News

दिंडोरीजवळ ईरटिगा विहिरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी अंत

  • शुक्रवारी रात्री १० वाजेची घटना; मृतांत सहा विद्यार्थ्यांचा समावेश

** एनजीएन न्यूज नेटवर्क

दिंडोरी : विशेष प्रतिनिधी

शहराजवळ शिवाजीनगर येथे शुक्रवारी रात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेत ईरटिगा मोटारगाडी विहिरीत कोसळून नऊ जणांचा दुर्दैवी अंत झाला. यामध्ये सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि इतर चार नातेवाईक यांचा समावेश आहे. एका खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून परत येताना काळाने या सर्वांवर घाला घातला.  घटनेनंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका खाजगी क्लासच्या कार्यक्रमावरून परतत असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास ईरटिगा मोटारगाडी शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत कोसळली. अपघातानंतर रात्री उशिरापर्यंत एनडीआरएफ, प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू होते.  विहिरीत पाणी असल्याने आणि अंधारात दिसत नसल्याने तांत्रिक अडचणी आल्या. अखेर अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तीमध्ये एकूण नऊ जण असल्याची माहिती मिळाली, ज्यात सहा विद्यार्थ्यांचा समावेश होता. सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याचे समजते. मृतांमध्ये दरगोडे कुटुंबातील सुनील दत्तू दरगोडे, राखी सुनील दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रद्धा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे अशा एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि इतर चार नातेवाईक यांचा समावेश आहे.

Comments are closed.