
- एनजीओ संचालक गजाआड; लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
सातपूर : बारा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातपूर पोलिसात फिर्याद देणारा एनजीओ संचालक आणि माध्यमकर्मी रवींद्र गणपत एरंडे ( ६३ ) याच्यावर लैंगिक शोषण आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्याकडे चौघे जण खंडणी मागत असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वीच एरंडे याने दिली होती. अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या चार जणांना याआधीच पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, एरंडे याच्यावर गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप देखील आहे. नाशिक तसेच इगतपुरीतील हॉटेलमध्ये त्याने महिलांवर अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार, घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. एरंडे याच्यावर ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात व्हिडीओ विक्रीचा संशय देखील आहे. एका पीडितेच्या तक्रारीवरुन लैंगिक शोषण, अॅट्रॉसिटी कायद्यान्वये शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. भोंदू अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच अशाच स्वरूपाचे प्रकरण पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, एरंडे याच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्याने हे प्रकरण उघडकीस आले. त्याच्याकडून 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणातील इतर स्पॉट्स आणि लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Comments are closed.