NGN News
Latest Marathi News

‘टीसीएस’चा मोठा निर्णय.. निदा खान कंपनीतून निलंबित

  • ९ एप्रिल रोजी एचआर हेड कडून पत्र

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला कंपनीने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ९ एप्रिल रोजीच निदा हिला निलंबनाचे पत्र पाठवले आहे. या प्रक्रियेतून कंपनीने निदा खानविरोधात मोठे पाऊल उचलले आहे.

निदा खान 27 डिसेंबर 2021 रोजी टीसीएसमध्ये प्रोसेस असोसिएट म्हणून रुजू झाली होती. सस्पेंड ऑर्डर तात्काळ जारी करण्यात झाली असून, त्यात तिचे नेटवर्क अ‍ॅक्सेस बंद करणे, कंपनीचे सर्व सामान परत करणे, ऑफिस किंवा वर्क फ्रॉम होमवर येण्यास मनाई, कर्मचाऱ्यांशी या प्रकरणाबाबत संपर्क न ठेवणे आणि पूर्ण गोपनीयता राखणे अशा अटी आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास अतिरिक्त शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे आदेश एचआर हेड शेखर कांबळे यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती समोर आली होती.

Comments are closed.