
- डॉक्टर जगतासह समाजासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी वर्षभर डॉक्टर जगतासह समाजासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प इंडियन मेडिकल असोसिएशन ( आयएमए ) नाशिक शाखेचे नूतन अध्यक्ष डॉ. विशाल पवार यांनी व्यक्त केला. अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. या उपक्रमांत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
आयएमए नाशिक शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी नुकतेच पदग्रहण केले. ज्येष्ठ साहित्यिक. ‘पानिपतकार’ विश्वास पाटील हे प्रमुख अतिथी तर आ. डॉ. राहुल आहेर, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, आयएमए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, नाशिक शाखेचे मावळते अध्यक्ष डॉ. निलेश निकम, डॉ. शलाका बागुल आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी डॉक्टर बांधवांचे विश्व केवळ वैद्यकीय सेवेपुरते मर्यादित राहिले नसून इतर अनेक क्षेत्रांत ते योगदान देत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. आ. डॉ. आहेर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे आवाहन केले. डॉ. तांबे म्हणाले, आयएमएने आपल्या कार्यातून समाजाशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली आहे. भविष्यात, समाजसेवेचा यज्ञ अव्याहत सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
नूतन पदाधिकारी असे :
डॉ. विशाल पवार – अध्यक्ष
डॉ. पंकज भट – सचिव
डॉ. योगेश बच्छाव, डॉ. निकिता पाटील – उपाध्यक्ष
डॉ. सागर भालेराव – खजिनदार
डॉ. मिलिंद भराडिया – सांस्कृतिक सचिव
नियोजित अध्यक्ष – डॉ. प्रशांत सोनवणे
Comments are closed.