NGN News
Latest Marathi News

अशोक खरात, नामकर्ण आवारे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

  • सिन्नर न्यायालयाकडून दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी 

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : लैंगिक अत्याचारातील आरोपी भोंदू अशोक खरात आणि पंतसंस्थेतील आर्थिक व्यवहार प्रकरणातील संशयित नामकर्ण आवारे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. सिन्नर सत्र न्यायालायाकडून दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दोघांना आज एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारेंना आधी पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली होती, पुन्हा आवश्यकता नाही असा युक्तिवाद आवारेच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. अशोक खरात आणि नामकर्ण आवारे ह्या दोघांची पाच दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली. अखेर न्यायालयाने दोहोंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणात अशोक खरातची ईडी चौकशी सुरू असल्याने ईडीने अशोक खरातचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे खरातला ईडीकडून ताब्यात घेतले जाईल. ईडीकडून कोर्टाकडे तसा अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे.

Comments are closed.