NGN News
Latest Marathi News

धक्कादायक ! पीडितांच्या गर्भपातासाठी खरातला डॉक्टर्सकडून हातभार

  • एसआयटी तपासात निष्पन्न; सोनोग्राफी सेंटर्स चालक देखील रडारवर

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : पीडित महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांचे गर्भपात करण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात याने शहरातील काही डॉक्टरांची मदत घेतल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. याव्यतिरिक्त, काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्स चालक देखील खरात याच्या संपर्कात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

 खरातने आपल्या ज्योतिषी वाणीतून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. आपल्याला दैवी शक्ती प्राप्त असल्याचा बनावही तो करीत असे. घरगुती आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याच्या बहाण्याने तो महिलांचे लैंगिक शोषण करीत असे. एका पिडीतेच्या गर्भपाताचे प्रकरण समोर आल्यानंतर भोंदूच्या कृत्यांचा भंडाफोड झाला. एखादी महिला गरोदर राहिली की खरात तिला गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा. या गोळ्या पुरवण्याचे काम त्याच्या संपर्कातील डॉक्टर्स करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे. यामध्ये नाशिक महापालिकेतील एका डॉक्टरचा समावेश आहे. त्याने या गैरकृत्यात मदत केल्याचा संशय आहे. खासगी सोनोग्राफी सेंटर्समध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, या दिशेने एसआयटीने तपास सुरु केला आहे.

दरम्यान, अशोक खरात याला प्रत्यक्षाप्रत्यक्ष मदत करणारे डॉक्टर्स आणि सोनोग्राफी सेन्टर्स चालक कोण, याबाबत शहरवासियांत औत्सुक्य निर्माण झाले आहे. चौकशीअंती काही नावे बाहेर येण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे.

Comments are closed.