
** एनजीएन न्यूज नेटवर्क
आजच्या काळात सामाजिक आणि राजकीय पटलावर ‘लव्ह जिहाद’ हा शब्द अत्यंत चर्चेचा आणि संवेदनशील ठरला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याबद्दलची वस्तुस्थिती, उद्देश आणि प्रतिबंधात्मक उपाय समजून घेणे आवश्यक आहे.
लव्ह जिहाद म्हणजे काय?
‘लव्ह जिहाद’ ही संज्ञा प्रामुख्याने अशा प्रकरणांसाठी वापरली जाते, जिथे मुस्लिम धर्मातील तरुण आपली खरी धार्मिक ओळख लपवून किंवा प्रेमाचे जाळे विणून हिंदू किंवा इतर धर्मातील मुलींना आकर्षित करतात. जर आपला धर्म समोरील मुलीला सांगितलाच तर आपल्या धर्मा बद्दल सकारात्मक विचार, चांगल्या सवयी, आपला धर्म स्विकारल्यास महिलांना मिळणारे संरक्षण याबाबत खूप कळत नकळत मन परिवर्तन करतात. मुलगी लग्नाला तयार झाल्यास किंवा लग्नानंतर संबंधित मुलीचे सक्तीने धर्मांतर करणे किंवा तिला विशिष्ट धार्मिक चौकटीत राहण्यास भाग पाडणे, याला ‘लव्ह जिहाद’ म्हटले जाते.
आता आपण बघू की हा प्रकार कोण आणि का करते?
अनेक सामाजिक संस्था आणि अभ्यासकांच्या मते, काही कट्टरपंथी विचारांच्या संघटना किंवा व्यक्तींकडून नियोजित पद्धतीने असे प्रकार घडवले जातात. या मागील उद्देश ठाम आणि निश्चित स्वरूपाचा असतो. या मागील मुख्य उद्देश लोकसंख्याशास्त्रीय बदल (Demographic Change) घडवून आणणे म्हणजेच विशिष्ट धर्माची लोकसंख्या वाढवणे आणि विशिष्ट धर्माचा प्रसार करणे हा असल्याचे मानले जाते. यासाठी इतर धर्माच्या मुलींना सोशल मीडिया च्या माध्यमातून शाळा-कॉलेजचे परिसर किंवा कामाची नौकरी चीं ठिकाणे येथे ओळख वाढवून, ठराविक वस्तूंची दुकानें टाकून ज्या तरुण मुलींच्या उपयोगाच्या असतात, जेथे ग्राहक म्हणून तरुण मुली सहज उपलब्ध होतात त्यामार्फत मुलींशी जवळीक करून मुलींना भावनिक जाळ्यात ओढले जाते.
शक्यतो स्वतःच्या गावापासून, घरापासून लांब राहून शिकणाऱ्या, नौकरी करणाऱ्या एकट्या मुली महिला, घटस्फोटीत एकल महिला, घरातून व्यवस्थित प्रेम अथवा अनुकूल सुरक्षित वातावरण न भेटलेल्या महिला ज्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी कोणाचा तरी आधार शोधत आहेत यांना शिकार बनवणे सोपे असते.
आपल्या नातेवाईक, शेजारी, आपल्या जाती धर्मातील, आपल्या ओळखीतील लोकांकडून धोका, विश्वासघात झालेल्या, फसवणूक झालेल्या, आपल्याच घरातल्यानी घात केलेल्या, जवळील लोकांनी गैरफायदा घेतलेल्या, बाहेरील जगाचा जास्त अनुभव नसलेल्या व्यवहारज्ञान दुनियादारीशी संबंध न आलेल्या मुली, महिला अश्या लोकांच्या जाळ्यात खूप पटकन फसतात. आपल्याच धर्मातील जातीतील मानस तरी कशी वागली? त्यांचा कटू अनुभव उराशी बाळगलेल्या आणि फक्त प्रेमासाठी आणि गोड शब्दासाठी आसूसलेल्या मुली परक्या मुलांसाठी आपला धर्म जात सुद्धा सोडायला तयार होतात. हे सर्व करत असताना अस तात्पुरत्या स्वरूपाच प्रेम मिळवत असताना लव्ह जिहाद मागील संभाव्य धोके आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. लग्नासाठी किंवा लग्नानंतर सक्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडले जाणे हा यामागील सगळ्यात मोठा धोका सर्व सामान्य मुलींना असतो. यासाठी मुलींचा प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, तिला तिचा धर्म रीती रिवाज, परंपरा, श्रद्धा सोडायला सांगितल्या जातात. हे सर्व त्या मुलीवर जबरदस्ती ने लादले जाते. जेव्हा मुलीला या मागील सत्य समजते, तेव्हा तिला धमकावणे किंवा तिचा छळ होणे, तिला ब्लॅकमेल करणे, तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले गेले असल्यास त्याचे विडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे, तिची बदनामी करणे या सारखे प्रकार केले जातात हेच वारंवार समोर आले आहे.
लव्ह जिहाद करणारी मुलं फसवणूक करतांना स्वतः चे नाव, शिक्षण, आर्थिक स्थिती आणि धर्म यांबाबत खोटी माहिती देतात. स्वतःला अविवाहित सांगतात, स्वतःचे खरे रूप, खरा उद्देश, खरी ओळख अथवा ते कुठल्या संस्था संघटना यासाठी काम करत आहेत, या आधी ते कुठे होते, ते मूळचे कुठले आहेत, त्यांचं ओरिजिन काय हे अजिबात उघड होवू देत नाहीत. शक्यतो हे लोकं समूहाने काम करतात. त्या समूहाला सर्व काम, काम करायची पद्धत, जबाबदारी समजावून सांगितलेले असते. समूहातील लोकं वेगवेगळ्या ठिकाणी पसरतात आणि आपले हेतू साध्य करण्यासाठी सावज शोधू लागतात.
या विषयाशी संबंधित प्रतिबंधात्मक कायदे आपल्याला माहिती असणे आज काळाची गरज आहे. भारतात विवाह आणि धर्मांतराबाबत काही विशेष कायदे आहेत. धर्मांतर विरोधी कायदा म्हणजेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंड यांसारख्या अनेक राज्यांनी फसवणुकीने किंवा सक्तीने होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात कडक कायदे (Anti-Conversion Laws) लागू केले आहेत.
या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. विशेष विवाह कायदा (Special Marriage Act)जर दोन व्यक्तींना आपला धर्म न बदलता लग्न करायचे असेल, तर ते या कायद्यांतर्गत नोंदणी करू शकतात.
आजचे सामाजिक वातावरण पाहता अथवा लव्ह जिहाद च्या वाढत चाललेल्या घटना पाहता मुलींनी आणि पालकांनी खूप काळजी घेणे अपेक्षित आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या संपर्कात येणाऱ्या, जवळीक साधू पाहणाऱ्या व्यक्तीची पूर्ण माहिती घ्या. कोणत्याही मुलाशी मैत्री किंवा प्रेमसंबंध जोडण्यापूर्वी त्याचे पूर्ण नाव, पत्ता, आधार कार्ड आणि त्याच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासून पहा ताबडतोब होकार देणे, त्याच्या सोबत शारीरिक संबंध ठेवणे, फिरायला जाणे, एकत्र फोटो विडिओ बनवणे टाळा. जर कोणी आपली धार्मिक ओळख लपवत असेल किंवा नाव बदलून सांगत असेल, तर त्वरित सावध व्हा. लवकर आणि लगेच विश्वास ठेवू नका. भेटवस्तू, महागड्या वस्तू किंवा सोशल मीडियावरील गोड बोलण्याला भुलू नका, मोठया हॉटेलात जाणे, उच्च राहणीमान यामुळे प्रभावीत होवू नका.
जर समोरची व्यक्ती लग्नाआधी किंवा नंतर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत असेल, तर ते धोक्याचे संकेत आहेत. अशी कोणतीही धोक्याची घंटा वाजली तर आपल्या जवळील, वरिष्ठ व्यक्तीला, मैत्रिणींना, पोलिसांना न घाबरता याबद्दल कल्पना द्या.
शक्यतो शालेय महाविद्यालयीन मुली अथवा नुकत्याच नौकरी ला लागलेल्या, बाहेरगावी शिकायला अथवा नौकरी साठी स्थायिक झालेल्या मुली लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात लवकर फ़सू शकतात अथवा त्यांना त्यांच्याच मित्र मैत्रिणी रूम पार्टनर, क्लास मेट, कार्यालयातील सहकारी यात ओढू शकतात. त्यामुळे त्यांचा सातत्याने पालकांशी सुसंवाद असणे खूप महत्वाचे आहे. स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, नवीन मित्र-मैत्रिणी यांच्याबद्दल पालकांशी मोकळेपणाने बोलणे त्यांच्या साठी गरजेचे आहे. रोज कुठे गेला होता, कोणाशी नवीन ओळख झाली, काय खाल, कोणात काही वेगळं विचित्र जाणवलं का, कुठे भीती वाटली का, कोणी कोणत्याही स्वरूपात त्रास दिला का, दबाव असल्यासारखं वाटलं का, कोणाची नजर, बोलण्यातला वेगळेपणा, चुकीचा हेतू लक्षात आला का हे मुलींनी ओळखायला शिकणे आणि त्वरित पालकांच्या कानावर घालणे अनिवार्य आहे. पालकांचा अनुभव, मार्गदर्शन, सल्ला आणि मदत तुम्हाला संकटातून वाचवू शकते.
सोशल मीडियाचा वापर सुद्धा अत्यंत सावध पणे करणे आजमितीला गरजेचे आहे. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना आणि वैयक्तिक माहिती शेअर करताना कमालीची सतर्कता बाळगा. फॅशन आणि ट्रेंड च्या नावाखाली मुली आजकाल स्वतःचे वाटेल तसें फोटो विडिओ आपण किती कूल आहोत हे दाखवायला पोस्ट करतात पण समोरचा त्याचा अर्थ हे लवकर फसणार सावज आहे असा घेतो. पालकांना सोशल मीडिया तल काही कळत नाही ते जुन्या विचाराचे आहेत आपल्याला फोल्लोवर्स वाढवायचे आहेत या नशेत मुली ऐका पेक्षा एक बोल्ड विडिओ टाकण्यासाठी धडपडत असतात. आपल्या फोटो आणि व्हिडीओ खाली किती खालच्या पातळीवर कंमेंट्स आहेत याचे भान त्यांना नसते आणि ज्या मुलीला इतकं मर्यादा सोडून बोललेलं चालत तिला काहीही चालू शकत हेच गृहीत धरून लव्ह जिहाद अथवा अन्य कोणताही चुकीचा हेतू मनात असलेली मुलं तुम्हाला संपर्क करून जवळीक वाढवतात.
प्रेम ही एक निखळ भावना आहे, मात्र जेव्हा त्यात फसवणूक, छळ आणि सक्तीचे धर्मांतर येते, तेव्हा तो गुन्हा ठरतो. समाजात वावरताना केवळ भावनेच्या आहारी न जाता बुद्धीने आणि सतर्कतेने निर्णय घेणे हीच काळाची गरज आहे. प्रेम कधीही जातं धर्म पंत प्रांत बघून केले जातं नाही. प्रेमाला कोणतीही व्याख्या किंवा मर्यादा नाही पण आपल्या सोईनुसार आपण समोरच्याला वागवत असू तर ते नक्कीच प्रेम नाही हे पहिले सजवून घ्या. प्रेमात
सतर्क राहणे आणि योग्य वेळी आवाज उठवणे हेच अशा प्रकारांना थांबवण्याचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे कुठेही असा रेड फ्लॅग दिसला तर त्वरित सावध व्हा आणि योग्य ती मदत मागायला घाबरू नका
हॅपी लाईफ काउनसेलिंग सर्विसेस
काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे
9766863443
Comments are closed.