
- स्मिता चंद्रात्रे, रवींद्र कुलकर्णी यांना ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शुक्ल यजूर्वेदिय मध्यंदिन ब्राह्मण संस्था, नाशिक यांच्या वतीने यजुर्वेद मंदिर येथे १९ बटूंचे सामूहिक व्रतबंध सोहळा धार्मिक वातावरणात उत्साहात पार पडला. संस्थेचे यंदाचे सामूहिक व्रतबंधाचे ४१ वे वर्ष असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
प्रारंभी गुरुजनांनी मंत्रोच्चारात विधीला सुरुवात केली. वे. मु. दिनेश शास्त्री गायधनी, वेमु कौस्तुभ शास्त्री शौचे, रवींद्र देव, उपेंद्र देव, पंडित भूषण शुक्ल आणि रामकृष्ण उपासनी यांनी समंत्र उपनयन संस्कार संपन्न केले. यावेळी सौ. स्मिता रविंद्र चंद्रात्रे तसेच रविंद्र दत्तात्रेय कुलकर्णी यांना डॉ. अभय सुखात्मे यांच्या हस्ते ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासाठी ॲड. मिलिंद चिंधडे आणि सौ. मुक्ता चिंधडे यांनी देणगी दिली.
श्री काळाराम मंदिराचे महंत सुधीर दास महाराज यांनी उपस्थित बटूंना वेदांचे महत्त्व सांगत शुभाशीर्वाद दिले.
सामूहिक व्रतबंध सोहळ्यासाठी कै. शैलजा शुक्ल, कै. उषा पाराशरे, सतीश शुक्ल, वृंदा कुलकर्णी, श्रीकांत निजामपूरकर, डॉ. शरद कुलकर्णी, ॲड. सुहास भणगे, सचिन वाघमारे, प्रतिभा वैद्य, हरीश चौबे, डी. एम. कुलकर्णी आणि प्रा. रविंद्र कुलकर्णी यांनी देणगीद्वारे सहकार्य केले.
यावेळी सतीश शुक्ल, ॲड. भानुदास शौचे, तुषार जोशी, धनंजय पुजारी, मंजुषा अगस्ते, महेंद्र गायधनी, चंद्रकांत महाजन, उदय जोशी, प्रतिक शुक्ल, अर्चना रोजेकर, सुभाष भणगे, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, रोहिणी कुलकर्णी, रत्नप्रभा गर्गे, अवधूत कुलकर्णी, रघुनाथ जोशी, प्रमोद मुळे, दिलीप शुक्ल, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, गजानन जाधव आणि सुनिता परमार यांनी सक्रिय सहभाग घेतला. हरीश चौबे, ओंकार शौचे, ऋत्विका शौचे, ओवी शौचे, ज्ञानेश देशपांडे आणि दीपक गजानन कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमास ॲड. भानुदास शौचे यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.