
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सेंट फ्रान्सिस शाळा, राणे नगरने एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शाळेची विद्यार्थिनी तन्वी इंगळे हिने ९८.८० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. समीक्षा शिंदे हिने ९८ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर आसावरी नागरकर हिने ९७.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांची कठोर मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे मनापासून मिळालेले सहकार्य यामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिंटो, व्यवस्थापकीय संचालिका डॉ. ग्रेस पिंटो तसेच संपूर्ण रायन परिवाराने विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना आशीर्वाद दिले.
शाळेच्या प्राचार्य मंजू पाटील आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.
Comments are closed.